Homeक्राईमबनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी अटक; पुणे गुन्हे शाखेची...

बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी अटक; पुणे गुन्हे शाखेची कारवाई

बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी अटक; पुणे गुन्हे शाखेची कारवाई
✍️नितीन करडे

पुणे : बनावट सोन्याची बिस्कीटे खरे असल्याचा भास निर्माण करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अट्टल आरोपीला खंडणी विरोधी पथक–२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस हवा ७३१७ नितीन मुंढे व ७८०५ कानिफनाथ कारखीले हे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत भाजी मंडई परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव हा त्याच्या साथीदारासह साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोड परिसरात चोरी करण्याच्या तयारीत आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक राम राजमाने (खंडणी विरोधी पथक–२) यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी दिलीप स्वामी याने दि.२४ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ फुटपाथवर जेवण वाटपासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका वयोवृद्ध महिलेला “तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवा” असे सांगून तिची फसवणूक करून ती पिशवी घेऊन पळाल्याची कबुली दिली. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची दोन बनावट बिस्कीटे व एक बेनटेक्सची चेन जप्त करण्यात आली. तसेच आरोपीने त्याच्या साथीदारासह इरटीगा कारमधून कराड (जि. सातारा) येथे जाऊन एका वृद्ध महिलेला बनावट सोन्याची बिस्कीटे दाखवून तिच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र काढून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी कराड सिटी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

पोलीस अभिलेख तपासला असता आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खुनासाठी अपहरण, अट्रॉसिटी व फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवाजीनगर सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) देखील काढले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात आणि आझाद पाटील यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड |नितीन करडे| पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले  | नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : चंदननगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले....

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती

उरुळी कांचन येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; प्रभात फेरीद्वारे जनजागृती ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन, प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन...

error: Content is protected !!