Homeताज्या बातम्यापेरणे-लोणीकंद शिवरस्ता खुला करावा- पै.संदिप (आप्पा) भोंडवे

पेरणे-लोणीकंद शिवरस्ता खुला करावा- पै.संदिप (आप्पा) भोंडवे

पेरणे-लोणीकंद शिवरस्ता खुला करावा-पै.संदिप(आप्पा) भोंडवे

पै.भोंडवे यांची हवेलीच्या तहसीलदार कोलते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे

हवेली तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या पेरणे-लोणीकंद शिवरस्ता खुला करावा अशी मागणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे यांनी हवेली तालुक्याचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे केली आहे.याबाबत निवेदन तहसीलदार कोलते यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून जगताप वस्ती,तांबे वस्ती, सरडेवस्तीकडे जाण्यासाठी ८६० मीटर लांबीचा पेरणे-लोणीकंद शिव रस्त्याचा वापर होतो.या रस्त्यांची रुंदी ३३ फूट आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र १२ ते १५ फूट रस्त्याची रुंदी आहे.या रस्त्याच्या डांबरीकरणसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाकडून मागील वर्षी २० लाख रुपये निधी नियोजित मंजूर होता.परंतु हा रस्ता अरुंद असल्याने निधी पुन्हा परत गेला.

या रस्त्याचा वापर पंचक्रोशीतील हजारो लोकांसाठी होत असून हा रस्ता अरुंद व पावसाळ्यात जलमय झाला असल्या कारणाने नागरिकांना या रस्त्यावरून जाताना चिखलाचा व मोठ मोठ्या खड्यांचा त्रासाला सहन करून सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे पंचक्रोशीतील व वाड्यावस्त्यांवरील नागरिक त्रस्त झालेले आहेत.

त्यामुळे या पेरणे – लोणीकंद शिव रस्त्याची अतीतातडीने मोजणी करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा.अशी या निवेदन पत्राद्वारे मागणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे यांनी महसूल खात्याच्या हवेली तालुक्याच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे केलेली आहे.

 हे निवेदन पत्र शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके ,भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,लोणीकंद व पेरणेचे सरपंच यांनाही माहितीसाठी दिले आहे.

[हद्दी निच्छित करण्यासाठी मोजणी कार्यालयात आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे.पुढे मोजणी कार्यालयाकडून यावर कार्यवाही होऊन आमच्याकडे आल्यास पुढे आम्ही त्वरित कार्यवाही करू.पै.संदिपआप्पा भोंडवे यांचे याबाबत आमचे बोलणे झाले आहे.

        – संदिप झिंगाडे,मंडलाधिकारी-लोणीकंद,पेरणे विभाग]

[या शिव रस्त्याबाबतचे सर्व कागदपत्र आम्हाला आणून दिली पाहिजेत,यामध्ये गाव नकाशा असो किंवा इतरत्र रस्त्याच्या बाजूचे जमिनींचे कागदपत्र ती दिली पाहिजेत.नुसते एक अर्ज देऊन काम होत नाही.याबाबत आम्ही माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे पाहतो.

            – तृप्ती कोलते,अप्पर तहसीलदार,हवेली तालुका]
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे  पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व...

error: Content is protected !!