Homeक्राईमपूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला!

पूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला!

✍️ नितीन करडे

पुणे (प्रतिनिधी) : पूर्व हवेली परिसरात अवैध वाळू उपशाने पुन्हा डोके वर काढले असून शिंदवणे रोड हा वाळू माफियांचा मुख्य मार्ग बनला आहे. अंधार पडला कि विना नंबरच्या गाड्यांमधून ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असताना महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि परिवहन विभाग मात्र ‘मूकदर्शक’ बनल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. वाळु वाहतूक सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर चारीही बाजूला वाहन नंबर नसून नियमांचे उघडपणे उल्लंघन सुरू आहे. एवढेच नाही तर उघड्या अवस्थेत वाळू वाहून नेल्याने रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.

” प्रशासनाचे मौन की संगनमत? वाळू माफियांचा बेधडक कारभार “

शासनाने वाळू उपसा बंदी घातलेली असतानाही सर्रास चोरी करून वाळू येते कुठून? शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे. “अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नियम धाब्यावर; वाळू माफियांचा रौद्ररूप, प्रशासन निष्क्रिय ?

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदा सुरू असताना महसूल विभाग, पोलीस आणि आरटीओ यांची नेमकी भूमिका काय? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का? की यामागे ‘आशीर्वाद’ आहे? अशी कुजबुजही परिसरात सुरू झाली आहे.

“कोण थांबवणार वाळू माफियांना?” 

तात्काळ कारवाईची मागणी नागरिक करत असुन या प्रकरणी तात्काळ कारवाई करून अवैध वाळू उपसा व वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी....

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई ✍️ नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : ट्रॅक्टर अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या पंचायत समिती,...

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक !

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक ! ✍️ नितीन करडे  पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्रात झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इंदापूर...

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे | पुणे (प्रतिनिधी) : हडपसर परिसरात कबुतरांच्या वादातून एका तरुणाचा...

ओएमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात

ओएमएसएस पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात पुणे : (प्रतिनिधी) ओएमएसएस (OMSS) पुणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात...

error: Content is protected !!