पुणे सोलापूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच
नितीन करडे✍️
पुणे: पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगामुळ हद्दीत एका रेसर दुचाकीने भरधाव वेगात येऊन दोन दुचाकींना पाठीमागून येऊन जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी आकरा वाजता घडली आहे. रेसर गाडीने स्पलेडर आणि बुलेटला जोरदार धडक दिली. या धडकेत स्पलेडर चालकाने महामार्गावर तीन पलट्या मारून साईटच्या चारीत पडुन जखमी झाले आहे. यावेळी मागून कंटीनेर आला होता. कंटेनर चालकाच्या सावधगिरी मुळे मोठा अपघात टळला. रेसर गाडी खुप जोरात होता अशी माहिती स्थानिक नागरिकानी दिली. याच परीसर दि. १९ रविवारी रोजी मोटार सायकल चा अपघात झाला त्यात एक शिक्षक जागीच मृत्यू झाले होते. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले.























