नितीन करडे
पुणे- जेजुरी मोरगाव रोड वर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्वीफ्ट कारने पीकअप ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह आठ जण ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार ( एम एच ४२ -ए एक्स -१०६०) श्रीराम ढाब्या समोर पिकअप टेम्पो मधील ( एम एच १२ एक्स एम ३६९४ ) साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार ( एम एच १२ टी के ९४८३) ला स्वीफ्ट कार जाऊन धडकली. या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघेजण, श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्वीफ्ट डिझायर कार मधील तिघे जण जागेवरच ठार झाले आहेत. तर दोन मुले,
एक महिला, दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
अपघातात मृतांची नावे पुढीलप्रमाणे-
सोमनाथ रामचंद्र वायसे व रामू संजीवन यादव, दोघेही रा. नाझरे कप, ता. पुरंदर, अजय कुमार चव्हाण, रा. उत्तरप्रदेश अजित अशोक जाधव, रा. कांजळे, ता. भोर जि. पुणे, किरण भारत राऊत, रा. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी, ता. इंदापूर जि. पुणे, अश्विनी शंकर ऐसार, रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर तर एकाची ओळख पटू शकली नाही.























