Homeक्राईमहिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला अवघ्या काही तासांत उरुळी कांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपी इरटिगा कारमधून पंढरपूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला अटक केली.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. मारुंजी, भुमकर चौक, हिंजवडी, पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी तरुणी हे दोघे शालेय जीवनापासून एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. पुढे दोघेही पुण्यात बी.सी.ए.चे शिक्षण घेण्यासाठी आले. शिक्षणादरम्यान संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्याने आरोपी दिनेश झांबरे याच्या मनात राग निर्माण झाला. याच रागातून गुरुवारी हिंजवडी परिसरातील तरुणी व तिचा मित्र राहत असलेल्या ठिकाणी आरोपी गेला. तेथे त्याने लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर आरोपी स्वतःच्या इरटिगा (एमएच-१३-ईके-५८२८) या कारमधून पुणे–सोलापूर महामार्गाने पंढरपूरच्या दिशेने पळून जात होता.

घटनेची माहिती हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांना दिली. त्यानुसार ही माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस स्टेशनसमोरील पुणे–सोलापूर महामार्गावर सापळा रचून नाकाबंदी केली. काही वेळातच भरधाव वेगाने आलेली संशयित इरटिगा कार पोलिसांनी अडवून आरोपी दिनेश झांबरे याला वाहनासह ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस कर्मचारी सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश होले, सचिन मोरे, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, निलेश जाधव, विकास लगस, ऋषीकेश रासकर, अश्वजित मोहोड, सुवर्णा गायकवाड तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परतेने सहभाग घेतला.

दरम्यान, आरोपीचा पाठलाग करत हिंजवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने, पोलीस कर्मचारी अशोक दुधावणे, प्रशांत गिलबिले, मिनीनाथ पवार व ओमप्रकाश कांबळे हे उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या धाडसी आणि वेगवान कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून उरुळी कांचन पोलिसांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : श्रीकृष्ण...

error: Content is protected !!