Homeशिक्षण-प्रशिक्षणहवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा २०२६ उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या रविंद्र कला मंदिरात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हवेली तालुक्यातील २५ शाळांमधील तब्बल ३२९ मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

१४, १७ आणि १९ वर्षांखालील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बौद्धिक कौशल्याचे दर्शन घडविले. प्रत्येक डावात विचारपूर्वक चाल खेळत विद्यार्थ्यांनी डावपेच, नियोजन, संयम आणि निर्णयक्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या संगीता शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे प्रभावी माध्यम आहे. या खेळामुळे एकाग्रता, निर्णयक्षमता, नियोजन, संयम आणि तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद आणि ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य दादा यादव, पर्यवेक्षक पृथ्वीराज कड, सत्यवान जगताप, अविनाश कांबळे, बापूसाहेब चौधरी, स्पर्धेतील पंच, अध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षक राजू माने, क्रीडा विभागप्रमुख संतोष टिळेकर आणि क्रीडा शिक्षक संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील शिक्षक व अध्यापकांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

विविध वयोगटांतील विजेते –

१४ वर्षांखालील मुले-मुली :

विवान खरे – साधू वासवानी गुरुकुल, अभिराम राजीव मेनन – वॉलनट स्कूल, फुरसुंगी, अर्णव रवींद्र यवले – फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल, प्रणित गोरख ठोंबरे – होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, प्रसून मंगेश असलमोल – भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, स्पृहा मिलिंद कमलापूर – होली एंजल्स कॉन्व्हेंट हायस्कूल, भाविका जयराम काळे – फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल, पवार आध्या धीरज – साधू वासवानी गुरुकुल, अन्वी रवींद्र काळोखे – फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल आणि शुभ्रा योगेश झोपे – फोर एस इंग्लिश मीडियम स्कूल.

१७ वर्षांखालील मुले-मुली :

गुरुराज राजकुमार वाळंदे – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, हर्षल तानोजी तावडे – होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, आलोक विवेककुमार शर्मा – अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, स्वस्तिक अमियकुमार कर – होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, मोहित बबलू सिंग – नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी, श्रेया दत्तात्रय जगताप – स्वामी विवेकानंद ॲकॅडमी, जिविका प्रमोद आंबेकर – होली एंजल्स कॉन्व्हेंट हायस्कूल, भूमी दत्तात्रय भालेकर – जगद्गुरु इंग्लिश मीडियम स्कूल, देहूगाव, ढगे सई गौतम – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, उरुळी कांचन आणि शर्वरी राजू जगदाळे – एंजल हायस्कूल, उरुळी कांचन.

१९ वर्षांखालील मुले-मुली :

आदित्य मोहन कुंभार – बी. एच. चाटे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शिवम सुहास सुपेकर – डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्वरूप नंदकुमार झुरुंगे – होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूल, समर्थ संतोष शिंदे – माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल हायर सेकंडरी स्कूल, सह्याद्री संतोष बाठे – बी. एच. चाटे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, समृद्धी राजकुमार वाळंदे – माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल हायर सेकंडरी स्कूल, भक्ती विपुल अछा – स्वामी विवेकानंद ॲकॅडमी, समृद्धी सचिन त्र्यंबके – स्वामी विवेकानंद ॲकॅडमी, आयुर्दा साईनाथ साठे – स्वामी विवेकानंद ॲकॅडमी आणि स्वरंजली विठ्ठल कुंजीर – पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी शांतपणे डावपेच आखत प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळली. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना आपल्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासोबतच आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळाली. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने सर, प्रास्ताविक भाडळे सर, तर आभार प्रदर्शन संदीप कांबळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!