नितीन करडे
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
हडपसर ते यवतदरम्यान सहापदरी उडाणपुल होणार
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने हडपसर ते उरुळी कांचनपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान सातत्याने मोठी वाहतूक कोंडी होते. ही होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाने मोठे निर्णय घेतला आहे. या पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतककोंडी सोडविण्यासाठी आता हडपसर ते यवतपर्यंत सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असुन या प्रकल्पासाठी ५ हजार २६२ कोटीच्या खर्चासही सोमवारी (दि. २) रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गवरील वाहतूक वेगवान होणार आहे. या सहापदरी उड्डाणपुलाच काम महाराष्ट्र राज्य पायाभूत ‘सुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी आदेश काढले आहेत.
“हडपसर ते यवतदरम्यानच्या प्रकल्पाचे काम बीओटी (बांधा वापरा, हस्तांतरित करा) त्वावर केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्याचेसुद्धा शासनाने जाहीर केले आहे, या कामाची वर्कऑर्डर दिल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे राज्य शासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची असणार आहे, असेदेखील स्पष्ट केले आहे”.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत या दरम्यान प्रवासासाठी नागरिकांना बराच वेळ लागतो. बऱ्याच वेळा नागरिकांना तासोंतास वाहतुककोंडीत अडकून राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने हडपसर ते यवतदरम्यान सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या रस्त्याच रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ताही सहापदरी करण्यात येणार आहे
