पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील खोकलाई चौकात आज सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. हवेलीचे वैभव असलेला यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आलेल्या अडचणींवर मात करून लवकर सुरु करणार आहे. याचबरोबर पुणे सोलापूर महामार्गासह पुणे नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यवत गावापर्यंत चार मजली उड्डाणपुल तर स्वारगेट ते उरुळी कांचन पर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, वैशाली नागवडे, पूनम चौधरी, नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, प्रवीण काळभोर, अमित (बाबा) कांचन, जितेंद्र बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली या गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता. या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्याही पुढे गेलेल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत व नगर परिषद यांना ग्रामपंचायत पेक्षा जास्त निधी मिळतो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी येथील जनतेचा होकार असल्यास, या भागासाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आहे.
यशवंत कारखान्याच्या जागेतील १०० एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची कृषी उत्पन्न बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कोठेही कमी पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. शिरूर हवेली तालुक्यातील जनतेच्या खूप समस्या आहेत. शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना प्रचंड मतांनी विजयी करा. तुंम्ही विकासाची चिंता करून नका. शिरूर हवेलीच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. अशी आश्वासन अजीत पवार यांनी दिले.
” शिवाजी आढळराव पाटील “- माजी खासदार
महाराष्ट्रात विकासाच्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय. कष्टकरी, शेतकरी, मजूर, पाणी पुरवठा योजना, लाडकी बहिण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी व अशा अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना राबविल्या आहेत. माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी हजारो माता भगिनींना देवदर्शन घडवून एक प्रकारे श्रावण बाळाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघातील श्रावण बाळ अर्थात महायुतीचे उमेदवार माऊली यांना एक संधी द्या. माऊली नक्की परिवर्तन घडवून दाखवेल.
” माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके “- महायुतीचे उमेदवार
अजित दादांनी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात मला उभा राहण्याची संधी दिल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. शिरूर हवेली तालुक्यातील शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मतदार संघात पाहिजे तेवढा विकास झाला नाही. दादांनी विविध लोककल्याणकारी योजना राबवून विकास केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार येणे महत्वाचे आहे. सर्वांगीण विकासासाठी या मतदार संघातून मला निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या.
