Homeमहत्त्वाचेशिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

✍️ नितीन करडे |

उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. १ एप्रिल) सायंकाळी झालेल्या पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटातील बाजूची माती, खडी, दगड व मोठे धोंडे थेट रस्त्यावर येऊन पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

जेजुरी–बेल्हे महामार्गावर शिंदवणे घाटात वाहनचालकांचा जीव धोक्यात; अनेक दुचाकी घसरल्या, चारचाकींचे टायर पंचर

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाटातील माती घसरून रस्त्यावर आल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असल्याने अनेक दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले, तर अनेक चारचाकी वाहनांचे टायर पंचर झाले. काही वाहनचालकांनी थोडक्यात मोठा अपघात टाळल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांच्या मते, या घाटात दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. मात्र, याकडे संबंधित प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. पाऊस झाल्यावर वेळेत रस्त्याची साफसफाई होने गरजेचे आहे. वेळेत सफाई होत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

“अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. तात्काळ रस्ता स्वच्छ करून सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष ? ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील...

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

error: Content is protected !!