विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..
-[लोणीकंदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला]-
✍️ विजय लोखंडे
वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतून राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदावर निवड झाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद यांचे पुतणे विवेक याच्या यशाने लोणीकंद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोणीकंद,वाघोली सह हवेली तालुक्यातील गावांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विवेक कंद हे कै.दत्तात्रय हरीभाऊ कंद यांचे चिरंजीव,कै.सावकार भाऊ व कृ.उ.बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद यांचे नातू आहेत.तर पुणे,हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद यांचे पुतणे आहेत. विवेक कंद यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळविलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.त्यांच्या यशामुळे कुटुंबीय, मित्र परिवार आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
[माझे पुतणे विवेक दत्तात्रय कंद याने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत एम.पी.एस.सी परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक पद मिळवले आहे.याचा आमच्या कंद परिवार व लोणीकंद गावाला अभिमान वाटत आनंद झाला आहे.लोणीकंद गावचे नाव राज्य स्तरावर नेहण्याचे काम आमच्या विवेकने केले आहे.त्याच्या या मेहनतीला सलाम करीत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहोत.
– रविंद्र नारायण कंद,माजी उपसभापती तथा संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली,पुणे
























