पुणे प्रतिनीधी : शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा दोन्ही बाजूने धडाडत असताना अचानकच ज्या घोडगंगा कारखान्या भोवती शिरूर चे राजकारण फिरत आहे. एवढे दिवस पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कामगारांना घरी बसवण्यात आले अशा कामगारांना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखाना प्रशासनाने मागील व आत्ताचा पगार देऊ तुम्ही कामावर या अशी विनंती करण्यास सुरुवात केलेली आहे. या गोष्टीचा कितपत परिणाम आता निवडणुकीवर होतोय हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
विद्यमान आमदार यांनी अनेक वेळा सांगितले की अजित दादा पवार यांनी या कारखान्यांना कर्ज मिळवून दिले नाही परंतु सुधीर फराटे यांनी सांगितले की हायकोर्टात एमसीडीसी कर्ज प्रकरणाच्या बाबतीत कारखान्याचा विषय मांडण्यासाठी कारखान्याचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही आजपर्यंत एकूण पाच तारखा हायकोर्टात झालेल्या आहेत मग जर कारखाना प्रशासनाला कारखान्याची व तेथील कामगारांची काळजीच असती तर त्यांनी उपस्थिती दर्शवली असती परंतु आता प्रचारासाठी कुठूनच लोक मिळत नसल्याने व समोर पराभव दिसत असल्याने पुन्हा एकदा कारखाना यांना समोर दिसत आहे. परंतु मतदार आता सुज्ञ आहेत आत्तापुरता पगार घ्यायचा का कारखाना कायमचा सुरू करून मानाची,हक्काची भाकर खायची हे ठरवतील.
