Homeमहत्त्वाचेरात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती

उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप

उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी रात्रगस्तीवर असलेल्या उरुळी कांचन पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका गरोदर महिलेची प्रसूती रस्त्यावरच सुखरूप पार पडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदत केल्याने आई आणि नवजात बाळाचा जीव वाचला. पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) रात्री १० वाजल्यापासून पोलीस हवालदार गाडेकर (ब. नं. ९३८) तसेच डायल ११२ चे अंमलदार आव्हळे, पोलीस कॉन्स्टेबल रात्रगस्त करीत होते. बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील तळवडी चौक रोडच्या कडेला एक पुरुष व महिला मदतीसाठी इकडे-तिकडे धावताना पोलिसांना दिसले.

पोलिसांनी तातडीने त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता, सदर पुरुषाचे नाव राजू भगवान काळे (रा. सोलापूर) असून त्यांची पत्नी ज्योती राजू काळे या गरोदर असल्याचे समोर आले. ज्योती काळे यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या असून सुमारे अर्धा तास मदत मिळत नसल्याचे राजू काळे यांनी पोलिसांना सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अंमलदारांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरू झाली. त्यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत उपलब्ध कपड्यांचा आडोसा तयार करून महिलेला आवश्यक ती मदत केली. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला महिलेने एका बाळाला जन्म दिला.

त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर महिला व नवजात बाळाला उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे महिलेला दाखल करण्यात आले असून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलिस अंमलदारांनी या कुटुंबाला आर्थिक मदतही केली.

दरम्यान, बुधवारी सकाळी पोलीस अंमलदार आव्हळे यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन तसेच दूरध्वनीवरून महिलेच्या प्रकृतीची चौकशी केली. महिला व तिचे बाळ सुखरूप असल्याचे समोर आले. संकटाच्या प्रसंगी पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि माणुसकी पाहून काळे कुटुंबीयांनी पोलिसांचे हात जोडून आभार मानले.

या घटनेत पोलिसांनी केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडली नाही, तर ‘पोलीस म्हणजे मदतीचा हात’ याचा प्रत्यय देत मानवतेचे दर्शन घडविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

error: Content is protected !!