पोलीसांना दोन वर्षापासून चकवा देत असलेला आरोपी अग्निशस्त्रासह ; युनिट ६ च्या पथकाने केला जेरबंद
नितीन करडे
पुणे :- आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने वरिष्ठांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचेविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले असताना आदेशाचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ६ येथील बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम हा स्वत: चे कब्जात बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत आहे. सदर प्राप्त बातमीची शहानिषा करणेकामी गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांनी वडाची वाडी, उंड्री, पुणे येथुन आरोपी साहिल राजु शेख, (वय २४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा.३८ मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग , फ्लॅट नं. १२०६, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे) यास कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवुन सखोल चौकशी करत त्याचे ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
सदरबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्धात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा २ , यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे,पोलीस उपनिरी. रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे व किर्ती मांदळे यांनी केली आहे.
