Homeताज्या बातम्यापुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार मजली उड्डाणपूल बांधणार, स्वारगेट ते...

पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार मजली उड्डाणपूल बांधणार, स्वारगेट ते उरुळी कांचन मेट्रो नेणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार मजली उड्डाणपूल बांधणार, स्वारगेट ते उरुळी कांचन मेट्रो नेणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार

विजय काळभोर
लोणी काळभोर : हवेलीचे वैभव असलेला यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आलेल्या अडचणींवर मात करून लवकर सुरु करणार आहे. याचबरोबर पुणे सोलापूर महामार्गासह पुणे नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यवत गावापर्यंत चार मजली उड्डाणपुल तर स्वारगेट ते उरुळी कांचन पर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गुलटेकडीला जाण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहे. त्यांच्यासाठी थेऊर येथील ‘यशवंत’च्या जागेत बाजार समिती सुरु करू. तसेच हवेलीच्या पूर्व भागासाठी हडपसर महानगर पालिकेचे नियोजन आहे. परंतु, यासाठी समाविष्ठ गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायु‌तीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील खोकलाई चौकात शनिवार (९ नोव्हेंबर) रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मतदारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, वैशाली नागवडे, पूनम चौधरी, नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, प्रवीण काळभोर, अमित बाबा कांचन, जितेंद्र बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली या गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता. या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्याही पुढे गेलेल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत व नगर परिषद यांना ग्रामपंचायत पेक्षा जास्त निधी मिळतो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी येथील जनतेचा होकार असल्यास, या भागासाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आहे.

यशवंत कारखान्याची ची 225 एकर जागा आहे. या जागेपैकी 100 एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची कृषी उत्पन्न बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कोठेही कमी पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. मला जर कारखाना बंद पडायचा असता तर घोडगंगा कशाला व्येंकटेश बंद पडला असता. बंद पडलेला कारखाना मुलाच्या हाती दिला आहे. कसा तो तरी चालू करणार? मी काही जास्त बोलणार नाही. परंतु, तुम्हा सर्वांना माहिती आहे. भावकी कशी असते ते. शिरूर हवेली तालुक्यातील जनतेच्या खूप समस्या आहेत. खडकवासला धरणातून शेतीसाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो प्रश्न लवकरच मार्गी लावू. पण, शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना प्रचंड मतांनी विजयी करा. तुंम्ही विकासाची चिंता करून नका. शिरूर हवेलीच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. यावेळी बोलताना शिवाजी आढळराव म्हणाले की, महाराष्ट्रात विकासाच्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय. कष्टकरी, शेतकरी, मजूर, पाणी पुरवठा योजना, लाडकी बहिण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी व अशा अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना राबविल्या आहेत. सद्या राजकारणामध्ये खूप गोंधळ झाला आहे. कुणी कोणाची कामे चोरायची आणि दुसऱ्याने आणलेल्या कामावर आपली लेबल लावायची. खामगाव टेक येथील नदीवरील पूल मंजूर करून आणला. मात्र विद्यमान आमदाराने पुलाच्या कामाचे उद्घाटन करून कामाचे श्रेय घ्यायचे. पण सत्ता असो अथवा नसो आम्ही मतदार संघात विकासकामे केली आहेत. माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनीही हजारो माता भगिनींना देवदर्शन घडवून एक प्रकारे श्रावण बाळाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघातील श्रावण बाळ अर्थात महायुतीचे उमेदवार माऊली यांना एक संधी द्या. माऊली नक्की परिवर्तन घडवून दाखवेल.

यावेळी बोलताना उमेदवार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, अजित दादांनी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात मला उभा राहण्याची संधी दिल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. शिरूर हवेली तालुक्यातील शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मतदार संघात पाहिजे तेवढा विकास झाला नाही. त्यामुळे जनता ही विद्यमान आमदारावर नाराज आहे. या सर्व समस्या सोडविण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये आहे. दादांनी विविध लोककल्याणकारी योजना राबवून विकास केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार येणे महत्वाचे आहे. सर्वांगीण विकासासाठी या मतदार संघातून मला निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या. असे आवाहन ज्ञानेश्वर कटके यांनी यावेळी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!