✍️नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले. असुन अपघातास निमंत्रण अशी परस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. उरुळी कांचन येथे
(ता. १३ जून) शुक्रवार रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडाक्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे सोलापूर महामार्गावर गारवा हॉटेलच्या समोर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरुप आले असुन महामार्गावर दीड ते दोन फुट पाणी साठल्याने पुण्याला जाणारी वाहतुक गारवा हॉटेलच्या समोर खोळंबली. त्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे नाकारता हि येत नाही.
संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष घालुन महामार्गावर साठत असलेले पाणी जाण्याची वेवस्था करावी त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखर होईल. अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी केली आहे.
