पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रा सचिन महाराज माथेफोड यांची निवड
राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी दैनिक लोकमतचे प्रा सचिन महाराज माथेफोड यांची एकमुखाने निवड करण्यात आली.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन सूंबे,जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय थोरात,पुणे जिल्हा सल्लागार पदी भाऊसाहेब महाडिक,हवेली तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत दुंडे तर हवेली कार्याध्यक्ष पदी गौरव कवडे यांची निवड झाली.यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे तसेच विजय लोखंडे व राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील पत्रकार विशेष ग्रामीण भागातील पत्रकार यांच्यासाठी विशेष काम करण्याचा मानस असून विशेष करून अनेक पत्रकारांच्या आरोग्याच्या बाबतीत ठोस पावले उचलणे गरजेचे आहेत तसेच पत्रकारिते सोबतच आपण सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे त्यासाठी स्वतःचे व्यवसाय नोकऱ्या कशा पद्धतीने वाढवता येतील व ते करून लोकशाहीचा चौथा स्तंभ अजून कसा बळकट होईल यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
सचिन माथेफोड, पुणे जिल्हा -अध्यक्ष
