नितीन करडे
पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत जणावरांची कत्तल होत असल्याचे शनिवार दि.५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गोरक्षक यांनी उघडकीस आणली आहे. यात कत्तल होत असलेल्या ठिकाणी एका गिरगायच्या वासराचे शिर व परिसर रक्ताने माखलेला व परिसरात वासराचे कातडे पडलेले अडळुन आले आहे. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे, महिला पो हवा सुजाता भुजबळ, पो कॉ अमोल खांडेकर,महिला होमगार्ड यांनी घटनास्थळाची पहाणी करुन दोन जणांना ताब्यात घेतले असुन पुढील कारवाई उरुळी कांचन पोलीस करत आहे.























