नितीन करडे ✍️
पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) रविवार ता. ५ जानेवारी रोजी ड्रिस युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
हे रक्तदान शिबीर उरुळी कांचन येथील बी. जी. शिर्के प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पराग काळकर, अमृता क्षीरसागर, रेशमा शेख सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के डी कांचन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी, आणि स्वयंसेवकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती असलेल्या ड्रिम्स दिनदशिकिचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना देशातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी युवकांची जागृती आणि सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन राबवित असलेले सर्व उपक्रम आणि त्यामध्ये असलेल्या युवकांचे सहभाग उल्लेखनीय तसेच मोलाचे आहे. असे कार्यकरमाचे प्रमुख पाहूणे डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.
शिबिराला देविदास भन्साळी, महादेव कांचन, सुरेखा भन्साळी, उरुळी कांचन चे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, राज्य मराठी पत्रकार परिषद संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन करडे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सचिन माथेफोड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सुंबे, हवेली तालुका कार्याध्यक्ष गौरव कवडे, राजाराम कांचन, सुनिल कांचन, सुनिल तांबे, संभाजी कांचन, बजरंग म्हस्के, जयप्रकाश बेंद्रे, टिळेकर वाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, डॉ. शिवाजी बोराडे, अशोक मोरे, राजेंद्र टिळेकर, सुनील जगताप, शांताराम चौधरी, सोमनाथ शेलार तसेच उरुळी कांचन मधील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ससून रक्तपेढी आणि तर्पण रक्तपेटी यांच्यामार्कत रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकुण ९९३ खक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी १६ महिला तर ९७७ पुरुष र्दात्यांनी सहभाग दर्शविला. फाउंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, नू्तन वर्षाचे ड्रिम्स दिनदर्शिका आणि भेट वस्तु देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश भालेराव तर प्रास्ताविक धनाजी ढावारे यांनी केले तर अरविंद चांदगुडे यांनी आभार मानले .























