Homeताज्या बातम्याटिळेकर वाडीच्या उपसरपंचपदी कल्पना टिळेकर यांची बिनविरोध निवड

टिळेकर वाडीच्या उपसरपंचपदी कल्पना टिळेकर यांची बिनविरोध निवड

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनीधी : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कल्पना श्रीकांत टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. टिळेकर वाडीच्या प्रथा-परंपरेनुसार माजी उपसरपंच वैशाली चौरे यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच वेळेत राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.

या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत कल्पना टिळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच गोवर्धन टिळेकर व ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. या बिनविरोध निवडीमुळे गावातील सलोखा व परंपरा कायम राहिल्याचे मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र टिळेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच गोवर्धन टिळेकर, माजी सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, सुशील राऊत, माजी उपसरपंच सुषमा टिळेकर, नंदा राऊत, वैशाली चौरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

गावातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र टिळेकर, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, सोसायटी चेअरमन अक्षय टिळेकर, लक्ष्मण आबा टिळेकर, सुभाष टिळेकर, बाळासाहेब चौरे, रोहिदास टिळेकर, तंटामुक्त अध्यक्ष अमर टिळेकर, महेश टिळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच कल्पना टिळेकर यांनी आपल्या मनोगतात उर्वरित विकासकामे सर्वांना विश्वासात घेऊन व एकत्रितपणे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त ✍️नितीन करडे पुणे : वीर (ता पुरंदर) ता. 11 फेब्रुवारी रोजी वीर येथे यात्रेचा उत्साह सुरू असतानाच...

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन समोरील...

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात ✍️ नितीन करडे पुणे : पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही गावांमध्ये मतदान प्रक्रियेत...

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला ✍️नितीन करडे पुणे : पूर्व हवेली तालुक्यातील पेठ गाव येथे राहणारे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या राहत्या घरावर...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च ✍️नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित...

error: Content is protected !!