Homeक्राईमचंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

चंदननगर पोलिसांची झपाट्याने कारवाई; मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या ४ तासांत उघड

|नितीन करडे|

पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक करून सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या जलद कारवाईमुळे चंदननगर पोलिसांचे कौतुक होत आहे.

दि. २७ एप्रिल २०२६ रोजी श्रीराम निवास, साईनाथनगर परिसरातील एका घरातून एकूण ७ मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार चंदननगर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली. तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा भा.न्या.सं. (BNS) कलम ३०५ (अ) अन्वये दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच चंदननगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास पथक आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. या दरम्यान वेदांत गणेश चव्हाण (वय १९, रा. मांजरी, पुणे) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व ७ मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकूण ६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण गुन्हा केवळ ४ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी टी.आर. लिंगाण्णा, गुरव, डांगे, बेंद्रे, लहाने आदींचा सहभाग होता. चंदननगर पोलिसांनी केलेल्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, गुन्हेगारांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन, प्रतिनिधी : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या कुंजीरवाडी-आळंदी...

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट ✍️ नितीन करडे पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहु-खामगाव जिल्हा परिषद गटातील...

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सायलेन्सर काढलेल्या मोटरसायकलींचा त्रास दिवसेंदिवस...

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारी...

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

error: Content is protected !!