उरुळी कांचन येथे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी
उरुळी कांचन प्रतिनिधी: हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील अखिल तळवाडी मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. गेले वीस वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरी करत असल्याचे अखिल तळवडी मित्र मंडळाचे मंडळाचे मार्गदर्शक सुनील (बापू) कांचन यांनी सांगितले. हे आमचे २१ वे वर्ष चालू आहे. ही दहीहंडी अनिल (आण्णा) कांचन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून हजारो नागरिकांनी सहभाग दर्शवला.
पूर्व हवेलीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू समजली जाणारी उरुळी कांचन येथील आखिल तळवाडी मित्र मंडळाची दहीहंडी १६ ऑगस्ट शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
नेत्रदीपक विद्युत रोषणाई मंत्रमुग्ध करणारे संगीत , आकर्षक सजावट आणि हजारो तरूण महिला वर्ग आणि बाळगोपाळांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे या दहीहंडी कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली .
यावेळी गोविंदांनी ‘गोविंदा आला रे आला’ च्या जयघोषात थर लावत रोमांचक प्रदर्शन सादर केले. उरळी कांचन येथील तळवाडी मित्र मंडळ हे गेले वीस वर्षापासून दहीहंडी उत्सव राबवत असून यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाला.
संपूर्ण महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. उरुळी कांचन येथील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थर लावून दहीहंडी फोडण्याचा जल्लोष केला. दहीहंडी ठिकाणी व परिसरात आकर्षक सजावट, संगीत असुन वातावरण भक्तिमय झाले होते. दहीहंडी सिद्धेश्वर गोविंदा पथक पिंपळगाव (ता.दौंड) या पथकाने फोडली.
तळवाडी मिञ मंडळाचे मार्गदर्शक तसेच माजी उपसरपंच सुनील (बापू) कांचन व मंडळाचे आधारस्तंभ अनिल (आण्णा) कांचन आणि अध्यक्ष ओंकार रानवडे यांचे मोठे सहकारी लाभले. या कार्यक्रमासाठी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके , हवेली तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष चारुशीला कांचन, राजेंद्र कांचन यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट दिली. मंडळाच्या वतीने भरत काळे , संदीप कुंजीर आप्पा रानवडे, ईश्वर कोतवाल,प्रवीण जुन्नरकर, अक्षय (बंटी) कांचन, निलेश कांचन,जयेश, कांचन, मयूर कुंजीर, आदेश कांचन, धनंजय लोहार यांनी या कार्यक्रासाठी परिश्रम घेतले. यावेळी उरुळी कांचन परिसरातील हजारो गोपाल भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच यावेळी उरुळी कांचन पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.























