नितीन करडे
-नेमलेले वाहतुक पोलीस करतात तरी काय ? नागरिकांचा सवाल ?….
पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गुरुवार (ता. २९) रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे चौकात बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यात चौकात वाहतुक पोलीस नसल्याने नागरिकानेच वाहतुक सुरळीत करण्याचे काम चालू केले. पण त्यावेळी नेमलेले वाहतुक पोलीस आहेत तरी कुठे ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे वाहतुक कोंडीची समस्या ही सतत पाहिला मिळत असुन या वाहतूक कोंडीला नागरिक ञस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीतुन नागरिकांची सुटका कधी?होणार असा सवाल नागरिकांनी केला आहे. ज्यावेळी वाहतूक कोंडी होते. त्यावेळी वाहणांच्या रांगाच रांगा पाहिला मिळतात हे काही नवीन नाही. होणाऱ्या याच वाहतूक कोंडीत अनेक रुग्नवाहिका रुग्नाणा घेऊन सायरण वाजवत तासोंतास अडकतात यात रुग्नांचे नातलगांचे घालमेल होते. तसेच शनिवार रविवारी पुण्यावरून सोलापूर दिशेला गावी जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ह्या सर्वाना या वाहतूक कोंडीचा सामणा करावा लागत असुन इरी वारी कामगार वर्गाला ही वाहतूक कोंडीचा नाहक ञास सहन करावा लागत आहे.
गेले काही दिवसापुर्वी महामार्गावरील व चौकातील अतिक्रमण हटवण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर पाटील यांनी सहभाग घेऊन अतिक्रमण हटवले होते. पण महिन्याभरातच पुन्हा वाढत्या अतिक्रमणाचा, व बेशिस्त पार्किंग यांचा फटका चौकातुन रस्ता ओलांडून जाताना वाहणांना बसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व वृद्ध तसेच शाळेचे मुलं यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणीच्या चौकात , महामार्गावर, बाजार चौकात (दोस्त पान सेंटर), आश्रम रोड, एमजी रोड, याठिकाणी बाहेरील गावातील नागरिक आपली चार चाकी भर रस्त्यात पार्किंग करुन खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. आशा मुजोर वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक सुभाष कांबळे यांनी केले आहे.
