प्रतिनिधी :नितीन करडे
उरुळी कांचन पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने आचार संहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. या करीता (ता.०६/११/२०२४ रोजी) सकाळी १०:१५ ते दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन परिसरातील गावांमधे रुट मार्च करण्यात आले. यामधे उरुळी कांचन येथील एम जी रोड, सोनार गल्ली,दत्तवाडी, डाळिंब रोड, पांढरस्थळ या मुख्य मार्गावर तसेच शिंदवणे, पेठगाव, नायगाव असा रूट मार्च करण्यात आला. या रूट मार्चमध्ये उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील ०२ अधिकारी व १२ अंमलदार, सशस्त्र सीमा बलचे ०२ अधिकारी व ३० जवान, सहभागी झालेले होते. काढण्यात आलेला रुट मार्च हा उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदशनाखाली पार पडला.
