Homeसामाजिकउरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस!

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उरुळी कांचन (ता. हवेली)  येथील अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६ चे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. तळवाडी चौक येथील वापरीमल सावळदास यांच्या समोर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी महोत्सव उत्साहात पार पडणार असल्याची माहिती उरुळी कांचन चे माजी सरपंच सुनील (बापू) कांचन यांनी दिली.

उरुळी कांचन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी महोत्सवाची परंपरा जपली जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकासाठी रोख १ लाख ११ हजार १११ रुपये इतके आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी उरुळी कांचनसह परिसरातील तसेच विविध ठिकाणांहून अनेक गोविंदा पथके सहभागी होणार असून, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचे थरारक प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गोविंदा पथके आपली कला आणि कौशल्य सादर करणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, यंदाच्या दहीहंडीचे १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस नेमके कोण देणार, याकडे उरुळी कांचनकरांचे लक्ष लागले आहे. बक्षीस वितरणाच्या निमित्ताने महोत्सवात आणखी रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे. या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन अनिल दत्तात्रय कांचन यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून आधास्थंभ सुनील (बापू ) कांचन आहेत. तसेच अखिल तळवाडी मित्र मंडळाच्या सहकार्याने हा दहीहंडी महोत्सव पार पडतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या महोत्सवामुळे तळवाडी चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

गेल्या २४ वर्षांपासून जपली जात असलेली दहीहंडीची परंपरा यंदाच्या २५ व्या वर्षी पुन्हा नव्या उत्साहात साजरी होत असून, गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साप आला! म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले; यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद करत...

साप आला! म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले; यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद करत ६ ग्रॅम सोने केले परत ✍️ नितीन करडे पुणे : दापोडी (ता....

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त ✍️ नितीन करडे पुणे : सासवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला,...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे | प्रतिनिधी- ✍️ नितीन करडे यवत पोलीस...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले; कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराला पुन्हा ‘बार’   उरुळी कांचन प्रतिनिधी :...

error: Content is protected !!