नितीन करडे
हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथील ग्रामस्थांनी गावपातळीवर तसेच परिसरातील देणगीदारांकडून मदत मिळवत सुमारे दीड एकराचे शेततळे देवस्थानच्या जागेमध्ये उभारले आहे.या गावचे जागृत असणारे ग्रामदैवत श्री म्हातोबा जोगेश्वरी आहेत.या देवस्थानाच्या नावावर असणाऱ्या जमिनीची देखभाल करण्यासाठी गावामार्फत ट्रस्ट नेमण्यात आली होती परंतु दरम्यानच्या कालखंडात सर्व विश्वस्त मयत झाल्याने जमिनीची देखभाल कोण करणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.त्यावेळी ग्रामसभा घेऊन गावच्या माध्यमातून ग्रामस्थांमधून दत्तात्रय जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती न्यायालयीन कामकाजासाठी व मालमत्ता देखभालीसाठी नेमण्यात आली होती.त्यानुसार या देवस्थानच्या एकूण जागेपैकी बावीस एकर शेतजमीन ओलिताखाली आणून त्या जागेचे उत्पन्न गावाला लावून द्यायचा निर्णय समस्त ग्रामस्थानी ग्रामसभेत घेतला होता त्या अनुषंगाने लोकवर्गणी मधून सदरील शेततळे बांधण्यात आलेले आहे.या शेततळ्याची पाणी साठवण्याची क्षमता दोन कोटी लिटर असून पाईप लाईन सहित अंदाजे तीस ते पस्तीस लाखापर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे.या शेततळ्यातील पाण्याच्या साठ्यावर उर्वरित जमिनीचा देखील पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.या शेततळ्यात नवीन कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले असून त्याच पाण्याचे जलपूजन दिनांक २५ रोजी उपस्थित महिला तसेच डॉ अभिजित दरक, डॉ राहुल काळभोर,हभप चेतन महाराज माथेफोड, एम ए सी बी अधिकारी सय्यद, प्रिंट व डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, सुवर्णा कांचन, नितीन करडे, सुनील तुपे, सुनील भोसले,राष्ट्रवादी हवेली अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,महसूल कर्मचारी व केशव काका तीखे,प्रवीण काका राजगुरु आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत प्रशासन, वि. वि.सोसायटी सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
आमच्याकडे सदरील देवस्थानच्या मालमत्तेबाबतचे विस्तृत विवरण कागदपत्र बाराव्या शतकापासूनचे आहे.बाराव्या शतकानंतर पहिल्यांदाच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी समस्त आळंदी म्हातोबा ग्रामस्थ आनंदाने एकत्र आले आहेत.यासाठी माझे सहकारी भगवान जवळकर, वाल्मीक जवळकर,सुभाष जवळकर, सचिन माथेफोड,कैलास शिवरकर,मोहन जवळकर,माऊली जवळकर,जालिंदर जवळकर तसेच कृती समिती मधील इतर सदस्य व सर्वच ग्रामस्थ दिवसरात्र मेहनत घेत आहेत.देवस्थानच्या जागेचा विकास करणे तसेच पुढील काळात उर्वरित जमीन ताब्यात घेणे ही या कृती समितीचे उद्दिष्ट आहे.
-दत्तात्रय जवळकर,कृती समिती अध्यक्ष-
