Homeताज्या बातम्याअवाढव्य खर्च केलेला रस्ता पहिल्याच पावसाने खचला, १७ लाख पाण्यात, नागरिकांच्या संतप्त...

अवाढव्य खर्च केलेला रस्ता पहिल्याच पावसाने खचला, १७ लाख पाण्यात, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

अवाढव्य खर्च केलेला रस्ता पहिल्याच पावसाने खचला, १७ लाख पाण्यात, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रोडवरील मुरकुटे बिल्डिंग ते आश्रम कॉर्नर हा रस्ता २ जून २०२५ रोजी काम पुर्ण करण्यात आले होते. या नवीन डांबरीकरण रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच खड्डे पडले आहेत.

” निकृष्ट रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचा संताप !”

(या रस्त्याची लांबी १८० मीटर तर रुंदी नऊ मीटर असुन तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून रस्ता केला होता, मात्र रस्त्यावर केवळ तीन महिन्यातच आणि पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले आहे.)

नुकताच डांबरीकरण झालेला हा रस्ता इतक्या कमी कालावधीत उखडू लागल्याने केलेले काम इतक्या निष्कृष्ट दर्जेचे आहे का ? याचे ग्रामपंचायत मार्फत योग्य प्रकारे ऑडिट होते की थेट बिल काढून कामावर पांघरून घातले जाते, असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

पुर्वी याच रस्त्यावरून जाताना अनेक खड्डे होते. नागरिकांना ये- जा करताना मोठी कसरत करावा लगत होती. व खड्डे चुकवताना अपघात ही झाले होते. आता कुठे नवीन रस्ता झाल्याने नागरिक समाधानी झाले होते. पण तीन महिन्यातच खड्डे पडल्याने नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

उरुळी कांचन गावाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या आश्रम रोडसह एम.जी. रोड आणि मुख्य बाजारपेठ (पालखी मार्ग) या तीनही मुख्य रस्त्यांचे गेली २० वर्षे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यातील आश्रम रोडचा एक टप्पा मात्र तीन महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्यात आला आणि अवघ्या पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडले. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांत नाराजी असून ग्रामपंचायतीमार्फत कामाचे ऑडिट झाले का, की थेट बिल काढून कामावर पांघरूण घातले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ? नागरिक गणेश तांबे यांनी ग्रामपंचायतीला तात्काळ रस्त्याचा दर्जा तपासून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

“शासन एवढा निधी देत आहे. तरी देखील रस्त्याचे निकृष्ट दर्जेचे काम झाले आहे. तीन महिन्यापूर्वीच डांबरीकरण झालेला रस्ता खचला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या कामाचा माहिती फलक कुठेही दिसत नाही.”

-शिवाजी ननवरे, स्थानिक नागरिक- उरुळी कांचन

” या कामाला जिल्हा परिषदचा निधी आहे. हे काम शाखा अभियंता यांच्या निगराणीखाली असते. तर गावाची विकास कामे असल्याने ग्रामपंचायतच्या देखरेखी खाली असत.”

– प्रकाश गळवे, ग्रामसेवक- उरुळी कांचन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!