सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच काळभैरवनाथ सेवा समितीचे विश्वस्त सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व विविध शासकीय योजनांच्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी विविध आरोग्य सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ घेतला.
वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना उपयोगी ठरणारे उपक्रम राबविण्याचा उपक्रम सुनील (आबा) तांबे यांच्या वतीने घेण्यात आला. शिबिरात रेशन कार्ड, स्मार्ट कार्ड, एनसीएमसी कार्ड, महा आयडी, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान भारत योजना यासह विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
शिबिरात १०५ नागरिकांनी रेशन कार्ड स्मार्ट कार्ड, ८५ नागरिकांनी एनसीएमसी कार्ड, ११२ नागरिकांनी महा आयडी, तर ६६ नागरिकांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला. आयुष्यमान भारत योजनेचा २४३ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ईसीजी व रक्तदान शिबिरात ७० नागरिकांनी, डोळे तपासणी व चष्मा वाटप उपक्रमात ४७५ नागरिकांनी, तर मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा १५० नागरिकांनी लाभ घेतला. याशिवाय ३० नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढून देण्यात आले.
यावेळी बोलताना माजी सरपंच संतोष कांचन यांनी सांगितले की, “सुनील (आबा) तांबे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना व सामाजिक उपक्रम राबवत असतात. वाढदिवसाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत मिळावी, हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.”
सुनील (आबा) तांबे यांच्या माध्यमातून यापूर्वीही वृक्षारोपण, आरोग्यविषयक उपक्रम तसेच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो, असे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन यांनी सांगितले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरामुळे एकाच ठिकाणी आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वाढदिवसाचा सामाजिक उपक्रमातून विधायक उपयोग करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. सुनील आबा तांबे यांच्या हस्ते उरुळी कांचन ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी महादेव कांचन माजी जिल्हा परिषद सदस्य, राजाराम कांचन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राजेंद्र ज्ञानोबा कांचन मनीभाई पतसंस्था संस्थापक, बाळासाहेब कांचन, संचालक रामदास चौधरी, मनोहर कांचन मा गांधी विद्यालय विश्वस्त, राजेंद्र टिळेकर, संतोष आबासो कांचन पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी, पंचायत समिती सदस्या कोमल कांबळे, अलंकार कांचन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य, मिलिंद जगताप सरपंच उरुळी कांचन, संतोष हरिभाऊ कांचन माजी सरपंच, मयूर कांचन, भाऊसो कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, स्वप्निशा कांचन, संचिता कांचन, सविता कांचन शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्ष, खामगाव टेक चे सरपंच दत्ता थोरात, टिळेकरवाडी चे माजी सरपंच सुभाष लोणकर, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, श्री महंत कपाटे, श्री काळभैरवनाथ सेवा समिती उपाध्यक्ष प्रताप कांचन, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण, सुभाष टिळेकर, मनीषा टिळेकर, कल्पना टिळेकर, संजय टिळेकर, योगेश उत्तम कांचन, योगेश भाऊसो कांचन, आबासो चव्हाण, पूजा सनस, तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान आवचट यांनी केले तर आभार शिवाजी ननावरे यांनी मानले.

























