Homeक्राईमसासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे...

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

✍️ नितीन करडे

पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18 एप्रिल ) सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास काळुबाई मंदिराजवळील वळणावर भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या चालकामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सासवड पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम नुसार, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश राजाराम काकडे (वय 40, रा. पांगारे, ता. पुरंदर) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी अक्षय सुहास परब (वय 30, सध्या रा. अमेनोरा, हडपसर, पुणे; मूळ रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) याने कार क्रमांक (MH 47 CD 7708) ही दारू पिऊन चालवत असताना हा अपघात घडवला. सदर घटना सासवड-विर रस्त्यावर काळुबाई मंदिराजवळील वळणावर घडली. आरोपी परब हा वीर कडून सासवडकडे जात असताना त्याने वाहनावरील नियंत्रण गमावले. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवित असताना समोरून येणाऱ्या (MH 12 CF 2788) या मोटारसायकल ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील रविंद्र गोपाळ काकडे (वय 65) व महेंद्र संपत काकडे (वय 53, दोघे रा. पांगारे, ता. पुरंदर) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.

तसेच, याच अपघातात (MH 12 HQ 1809) या दुसऱ्या मोटारसायकल वरील तुकाराम जयवंत पोमण (वय 60) व सुरेखा तुकाराम पोमण (वय 50, रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी अक्षय परब याला ताब्यात घेत अटक केली आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!