Homeक्राईमयवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद
एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध

|✍️ नितीन करडे |

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूर (ता. दौंड) येथील गिट्स कंपनीमधून सुमारे ९४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या आरोपीला यवत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. सागर बिभिषण जाधव (वय २५, व्यवसाय मजुरी, सध्या रा. तुपेवस्ती, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. सहजपूर, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (ता. २ सप्टेंबर ) रोजी रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर (ता. दौंड) गावातील गिट्स कंपनीमध्ये चोरीची घटना घडली. कंपनीमधील वेगवेगळ्या आकाराच्या सुमारे ९४ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबल चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलिसांनी तातडीने तपास पथकाची नियुक्ती केली. पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली. फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना चोरीच्या घटनेत सागर जाधव याचा सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीची चोरीची तांब्याची केबल तसेच गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त केली. या दोन्हींची एकत्रित किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविंद्र मोहिते करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कंपनीतील चोरीचा छडा लावत आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे औद्योगिक परिसरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा तपास अधिक गतिमान झाल्याचे दिसून येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनित कुऱ्हाडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

error: Content is protected !!