पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटिकरण टीमकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघड करण्यात आले असुन आरोपीला अटक करण्यात आले आहे. मुंढवा पोलीस स्टेशन डी बी पथकातील अधिकारी व स्टाफ हे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव यांना पेट्रोलिंग दरम्यान एका दुचाकीवर असलेला व्यक्ती हा संशयस्पद वाटल्याने त्याला थांबवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मिथुन सुगंध लोखंडे (वय 22 रा. मिरेकर वस्ती, हडपसर पुणे), असे सांगितले त्याच्या कडील दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला मुंढवा पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ही चोरी केल्याचे कबूल केले सदर मिळालेल्या माहितीचे आधारे त्याच्याजवळ असलेली मोटार सायकल ही मुंढवा येथील चोरीची असलेची निष्पन्न झालेने त्यांस सदर गुन्ह्यात त्यास आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. व त्याच्याकडून एकूण 85,000/-रु कि. मुद्देमाल च्या एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या व त्याला अटक करण्यात आले. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त झोन 5 राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार राजू कदम, योगेश गायकवाड, शिवाजी जाधव,विनोद साळुंखे, राहुल धोत्रे, स्वप्नील रासकर, योगेश राऊत यांनी केली.
























