पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार (ता. २८ मे ) रोजी साडेचार वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकी थेट बसच्या मागील भागाखाली घुसल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (क्र. एमएच 14 जी- यू 6980) ही प्रवाशांना उतरविण्यासाठी महामार्गावर थांबली असल्याची माहिती समोर येत आहे . त्याचवेळी मागून येणारी टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (क्र. एमएच 12 आर ई -3794) बसच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी बसच्या खाली घुसली. या अपघातात दुचाकीवरील एकदम फिरते एक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश भोसले, पो कॉन्स्टेबल अमोल खांडेकर, धनंजय भोसल, प्रदीप बालगुडे, धनंजय भोसले, व होमगार्ड झोडगे, यांनी वाहतूक सुरळीत केली. तसेच अधीक तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.





















