Homeमहत्त्वाचेनायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप शामराव शिंदे (वय ४१, व्यवसाय मजुरी, रा. श्रेयस रोज नर्सरी, नायगाव फाटा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, (ता.२१ मे२०२६) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी श्रेयस रोज नर्सरी येथे काम करत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा पियुष संदीप शिंदे (वय १६ वर्षे १० महिने) हा घरी होता. घरातील किरकोळ कारणावरून आईने त्याला लहान भावासोबत भांडू नको, असे सांगितले होते. त्यानंतर पियुष कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला.

कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो अद्याप मिळून आलेला नसल्याने अज्ञात इसमाने त्याला फूस लावून किंवा पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलाचे वर्णन : पियुष याची उंची सुमारे ४ फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट होती. पायात निळ्या रंगाची सँडल असून डोक्यावर जुन्या जखमेची खुण आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब मत्रे हे करीत आहेत. पोलीसांना फिर्यादी यांनी सांगितले की या आधीही तो दोन ते तीन वेळा घरातून निघून गेला होता असे पोलिसांनी सांगितले. तसेच पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सदर मुला बाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित पुढील नंबर वर संपर्क साधावा.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन- 020-26926287 बापूसाहेब मत्रे – 9552576117

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ! एका रात्रीत दोन ठिकाणी चोरी; सीसीटीव्हीत तीन चोर कैद, परिसरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (प्रतिनिधी): पुणे–सोलापूर महामार्गालगत उरुळी...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची दुसरी घटना सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; पुणे–सोलापूर महामार्गावरील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण,...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

error: Content is protected !!