नितीन करडे
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन हदीत विधानसभा निवडणुक -२०२४ चे अनुषंगाने अवैद्य धंदे, रेकॉर्ड वरिल आरोपी चेक करणे व गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पो नि युवराज नांद्रे स्वारगेट पो.स्टेशच्या यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरिल गुन्हेगार शयाम युवराज उमाप हा पिस्तोल विक्री साठी केनॉल रोड गुलटेकडी येथे उप मृदा सरवेकषण कार्यालयाच्या कंपाऊंडच्या बाहेर उभा आहे.अशी माहीती मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊून खात्री करुन बातमी प्रमाणे सदर इसम मिळुन आला. सहा.पो निरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी पोलीस स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जाबुन खात्री करुन सापळा रचुन रेकॉर्ड वरिल गुन्हेगार श्याम युवराज उमाप वय २४
वर्ष रा. मिनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी पुणे यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता
त्यांचे कडे १ गावठी पिस्तोल व ०२ जिवंत काडतुसे असा एकुण २१,०००/-रू.चा माल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे हत्यार कायदाकलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-२. पुणे शहर. श्रीमती स्मार्तना पाटील, सहा.पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग,पुणे शहर राहुल आवारे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशनचे युवराज नांद्रे यांच्या आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर, पोलीस उप निरीक्षक रवींद्र कस्पटे. पो अमंलदार सुधीर इंगळे, संदीप घुले, सुजय पवार, रमेश चव्हाण, तनपुरे, फिरोज शेख, दिपक खेंदाड, हर्षल शिंदे, दुधे, मोराळे प्रशांत टोणपे यांनी केली आहे.























