Homeक्राईमजन्मदात्या बापाचा खून करणाऱ्या नराधम मुलास जन्मठेपेची शिक्षा 

जन्मदात्या बापाचा खून करणाऱ्या नराधम मुलास जन्मठेपेची शिक्षा 

 पुणे : पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयावरून मुलाने बापावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवारात सन २०१४ साली घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाला न्यायालयाने जन्मठेप सह २५ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी (दि.०१) सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत. सचिन अंबादास खोत (वय-२७, रा. उरुळी कांचन इरीगेशन कॉलनी जवळ मुळ गाव केवड ता माढा जि सोलापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अंबादास दिगंबर खोत (वय-५२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजिनाथ जगन्नाथ शिंदे (वय ४२) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास खोत हे शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील गट नं ३८० मध्ये काम करीत होते. तेव्हा आरोपी सचिन हा त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. तेव्हा सचिन याने त्याच्या पत्नीशी वाईट नजरेने बघता. असा प्रश्न वडील अंबादास खोत यांना केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा सचिन याने ऊस तोडण्याचा कोयता हातात घेऊन वडिलांच्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले. या मारहाणीत अंबादास खोत यांचा जागीच मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर आरोपी सचिन खोत हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. व त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने वकील नामदेव तरळगटटी यांनी कामकाज पहिले. या खटल्यात अॅड. तरळगटटी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सचिन खोत याला जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

error: Content is protected !!