Homeमहत्त्वाचेचंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

चंदननगर पोलिसांची तत्परता; आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले 

| नितीन करडे |

पुणे प्रतिनिधी : चंदननगर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडत व्यक्तीचे प्राण वाचवले. पोलीसांचे परिसरात कौतुक होत आहे. ता. 27 एप्रिल चंदननगर पोलीस स्टेशनच्या मार्शल पथकाने दाखवलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचल्याची घटना समोर आली आहे. पोलीस अंमलदार क्र. 2817 तलवारे आणि पोलीस अंमलदार क्र. 779 सतीश कतारी यांनी वेळेवर हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस अंमलदार महात्मा फुले मार्शल पथकात दिवसपाळी कर्तव्यावर असताना सायंकाळी 7:08 वाजण्याच्या सुमारास एम.डी.टी. मशीनवर CFS36230850 द्वारे ‘Suicide Attempt’ संदर्भात कॉल प्राप्त झाला. तत्काळ त्यांनी कॉलरशी संपर्क साधला असता, संबंधित व्यक्ती घरी नसून त्यांच्या वडिलांनी घराचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्येचा प्रयत्न सुरू केल्याची धक्कादायक माहिती मिळाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून मार्शल पथकाने दिलेल्या पत्त्यावर तातडीने धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी तात्काळ वेल्डरला बोलावून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच संबंधित व्यक्ती गळफास घेण्याच्या स्थितीत आढळून आली. कोणतीही वेळ न दवडता दोन्ही अंमलदारांनी त्यांना खाली उतरवून सुरक्षितपणे बेडवर बसवले.

यानंतर त्यांनी तात्काळ नातेवाईकांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. प्राथमिक उपचारानंतर त्या व्यक्तीस पुढील समुपदेशनासाठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. पोलिसांनी योग्य मार्गदर्शन करत संबंधित व्यक्तीस त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. दरम्यान, या उल्लेखनीय आणि जीव वाचवणाऱ्या कामगिरीबद्दल दोन्ही पोलीस अंमलदारांचा चंदननगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या घटनेमुळे चंदननगर पोलिसांची तत्परता, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!