नितीन करडे
उरुळी कांचन : येथील बगाडे वस्ती येथे एकाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवार दि १० एप्रिल रोजी साडे सात वाजण्याच्या दरम्यान घडली असुन घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, सहा पो उपनिरीक्षक रमेश भोसले, पो कॉ मनोज रत्नपारखी, रासकर, सचिन भोसले, यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मिळालेल्या माहिती नुसार एक व्यक्ती सात वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन वरुन बगाडे वस्तीकडे निघाला होता. अचानक दोन मोटार सायकल वरुन आलेल्या चार पाच जणांनी गाडी आडवी लाऊन शिवीगाळ करत कपडी फाटे पर्यंत मारहाण करुन गाडीवर टाकुन गोळे वस्ती येथे पुन्हा मारहाण केले असल्याची माहिती समोर आली आहे. अध्याप त्या व्यक्ती ला मारहाण का झाली याचे कारण समजु शकले नाही. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहे.























