Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

✍️ नितीन करडे |

उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, चोरी करणारा नेमका कोण आणि वाहन इतक्या काळ कुठे होते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे रोडवरील ‘पांडुरंग कृपा’ येथून २३ डिसेंबर २०२४ रोजी भर दिवसा सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास होंडा कंपनीची पॅशन प्रो (क्र. एमएच १२ एचवाय ६३३४) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, रविवार (दि. ५ एप्रिल २०२६) रोजी हीच दुचाकी शिंदवणे रोड परिसरात, घरापासून काही अंतरावर संशयास्पद अवस्थेत आढळून आली असल्याचे गाडी मालक मथु दशरथ प्रसाद, (वय ४२ वर्ष) यांनी सांगितले.

निदर्शनास आल्यानंतर संबंधित वाहनाची ओळख पटवून मालक मथु प्रसाद यांनी ११२ (पोलीस मदत) वर कॉल करून मदत मागून घेतली. विशेष म्हणजे, चोरी गेलेले वाहन इतक्या दीर्घ कालावधीनंतर त्याच परिसरात सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरट्याने वाहन वापरले का? की काही कारणास्तव ते लपवून ठेवले होते? अथवा अन्य गुन्ह्यात वापर केल्यानंतर टाकून दिले का? याबाबत चर्चा रंगली आहे.

[उरुळी कांचन पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वाहन चोरीमागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच स्थानिकांकडून चौकशी करून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल]

 -सचिन वांगडे- पोलीस निरीक्षक,उरुळी कांचन पोलीस स्टेशन 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच  ✍️ नितीन करडे उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा उरुळी कांचन, (ता. हवेली) :...

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत खोटी व दिशाभूल...

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

error: Content is protected !!