Homeमहत्त्वाचेउरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प! 
पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे शुक्रवारी (ता. २४ जुलै) सायंकाळी झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने हजारो वाहनचालकांचा संयम सुटला. सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर उरुळी कांचन येथे एका बसचा टायर अचानक पंचर झाल्याने महामार्ग अक्षरशः ठप्प झाला. अवघ्या एका निकामी बसमुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना तब्बल दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

या कोंडीत रुग्णवाहिका, मालवाहू ट्रक, खासगी बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनेही अडकून पडली. कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांचे महत्त्वाचे व्यवहार खोळंबले, तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचीही माहिती समोर आली.

विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी सुरू होऊन जवळपास पाऊण तास उलटल्यानंतरही वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त वाहनचालकांनी, “वाहतूक पोलीस होते तरी कुठे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. वेळेत वाहतूक नियंत्रण केले असते, तर एवढी मोठी कोंडी टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

उरुळी कांचन हे पुणे–सोलापूर महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून, किरकोळ बिघाड झाला तरी संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडते. मात्र अशा घटनांसाठी कोणतीही तातडीची यंत्रणा कार्यरत नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट झाले आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन, तत्काळ क्रेनची व्यवस्था आणि २४ तास वाहतूक पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करावी. अन्यथा अशा कोंड्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र सुरुच ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!