उरुळी कांचन येथे मुसळधार पावसामुळे येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासना सह कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी..
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उरुळी कांचन प्रशासन सह कर्मचारी कंबर कसली असुन दोन दिवसापासून कर्मचारी काम करत आहे. प्रशासनाकडून उरुळी कांचन परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मुसळधार पावसामुळे येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात व घरात पाणी साचणे, ड्रेनेज तुंबणे, वीज समस्या, वाहतूक कोंडीची समस्या, या समस्यांचे निवारण दोन दिवस पासून प्रशासन करत आहे. तरी नागरिकांना येणाऱ्या समस्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महावितरण मंडळ सज्ज असुन नागरिकांनी संबंधित समस्येवर निवारण करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उरुळी कांचन ग्रामपंचायत, महावितरण, पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे.
“संपर्क साधण्यासाठी दिलेले क्रमांक-
ज्यांच्या घरात किंवा परिसरात पाणी साचले असल्यास किंवा ड्रेनेज तुंबले असेल यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
ग्रामपंचायत उरुळी कांचन-
हिरा जाधव – 📞 9921883365,
रोहिदास माने -📞 8805730318,
वाहतूक कोंडी संदर्भात -उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या
सुजाता भुजबळ – 📞9022221053,
महावितरण संदर्भात,
होनमाने – 📞7875767730,
याच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा.
उरुळी कांचन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच ग्रा. कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी हे सर्व नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र जीवाची पर्वा न करता भर पावसात काम करत अल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे काम करत असलेल्या कर्मचारी व प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक होत असुन नागरिकांनी प्रशासनाचे अभार मानले.























