उरुळी कांचन येथे डुकरांची व शेळीच्या करडाची चोरी, विशेष म्हणजे शेळीमालकाच्या पाहण्यातलाच चोर
उरुळी कांचन
येथे डुकरांची व शेळीच्या करडाची चोरी झाली असुन चोर हा शेळी मालकाच्या पाहण्यातलाच असल्याचे शेळीमालकाने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील जय मल्हार रोड वरील डुक्करांची व शेळीच्या करडाची चोरी राञी दीड वाजण्याच्या सुमारास झाली असल्याचे शेळी मालक घनश्याम जाधव यांनी सांगितले. त्यावेळी शेळीमालकाने चोराला विरोध केला पण चोराने त्याच्या जवळील धारदार शस्त्राचा धाक दाखवुन बाजार मैदान मधे उभा असलेल्या अशोक लेलन कपनीच्या टेम्पोच्या बाजूने पळ काढला.व टेम्पो घेऊन पसार झाले. तसेच चोर विना नकाबाचा असल्याने शेळीमालकाने त्याला ओळखले आहे.























