Homeमहत्त्वाचेउरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक यांची जयंती उरुळी कांचन ग्रामपंतायत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि समाजासाठी केलेले कार्य यांची उपस्थितांनी आठवण करून दिली. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा, तसेच समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाची भावना अधिक बळकट करावी, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमस्थळी उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. नागरिक, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा जयघोष करण्यात आला. तसेच सामाजिक एकता आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

उमाजी नाईक यांचा संघर्ष हा केवळ इतिहासाचा भाग नसून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा जयंती उत्सवांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उरुळी कांचन परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत युवकांची उपस्थिती, घोषणांनी आणि अभिवादनाने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना संतोष आबासो कांचन, सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन सुनील (बापू ) कांचन , माजी उपसरपंच युवराज कांचन, भाऊसाहेब तुपे, तसेच चंद्रकांत खोमणे, लक्ष्मण खोमणे, प्रशांत रोडे, सतीश साळवे, सतीश खोमणे, संतोष चव्हाण , आण्णा चव्हाण ,प्रकाश खोमणे, सुहास चव्हाण तसेच , ग्रामपंचायत कर्मचारी, आदी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!