Homeशिक्षण-प्रशिक्षणउरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात कराटे यल्लो बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात कराटे यल्लो बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालय (CBSE Affiliation No. 1131458) या फक्त मुलींसाठी असलेल्या इंग्रजी माध्यम शाळेत नुकतेच कराटे यल्लो बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तिसरी ते आठवीपर्यंतच्या ४३ विद्यार्थिनींनी या परीक्षेत आत्मविश्वासाने सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.

शाळेच्या अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन, संचालिका डॉ. नुपूर सुरेश कांचन आणि मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. कराटे प्रशिक्षक शितल कांचन यांनी विद्यार्थिनींना नियमित सराव, शिस्त आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देत परीक्षेसाठी सज्ज केले.

या परीक्षेसाठी (USKA) संस्थेचे अध्यक्ष व संचालक रेन्शी संजय स्टेट, राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट रेन्शी आरती मोहित मल्ला तसेच शिशान गणेश अहिरकर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ४३ विद्यार्थिनींना यल्लो बेल्ट प्रदान करण्यात आला. विद्यार्थिनींनी काता, कुमिते आणि मूलभूत तंत्रांचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.

मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित करण्यासाठी कराटे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटे क्षेत्रात यश मिळवून देण्याचे ध्येय व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकवर्गाने समाधान व्यक्त केले. मुलींमध्ये आत्मसंरक्षणाची भावना रुजविण्यासाठी शाळेने घेतलेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

उन्नती कन्या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि आत्मसंरक्षण प्रशिक्षणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे या यशस्वी उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!