Homeताज्या बातम्याअशुद्ध पाणी पिल्यामुळे पेरणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

अशुद्ध पाणी पिल्यामुळे पेरणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

अशुद्ध पाणी पिल्यामुळे पेरणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

दूषित पाण्याची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास मा.सरपंच निलेश वाळके आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) या गावांमध्ये ऐन पावसाळ्यात मागील काही दिवसांपासून गावठाण,वाड्या वस्त्यांवर व्यावसायिक आर.ओ.पिण्याचे पाणी प्लांटच्या माध्यमातून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले असून गावामध्ये ऐन पावसाळ्याच्या काळात साथीचे व इतरत्र अनेक आजार बळावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र(सरकारी दवाखाना) पेरणे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्याचे समोर आले आहे.यात

हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पुणे-नगर रस्त्यावर,भीमा नदी किनारी अधिक लोकसंख्या असलेल्या पेरणे गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याचा पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा तसेच दैनंदिन वापरासाठी होत असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.परंतु याकडे स्थानिक स्वराज्य संस्था पेरणे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी विकत देण्यासाठी आर.ओ.प्लांटची अधिक संख्या वाढत आहे.

” आठ आर.ओ.प्लांटचे पाणी दूषित असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल “

पेरणे येथे गावठाण,गावातील वाड्या,वस्त्यांवर स्थानिक नागरिकांकडून व्यवसाय म्हणून आर.ओ.पिण्याचे पाण्याचे प्लांट तयार करून उभारण्यात आले आहेत.पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आर.ओ.पाणी प्लांट वरील पाण्याची तपासणी चाचणी केली असता सुमारे ८ (आठ) आर.ओ.प्लांटचे पिण्याचे पाणी अयोग्य अशुद्ध असल्याचे २८ जुलै रोजीचा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा,पुणे यांच्याकडून आलेल्या निष्कर्ष अहवालात निदर्शनास आले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे.

याबाबत तक्रार करताना पेरणे गावचे माजी सरपंच निलेश उर्फ बाबाजी वाळके यांनी सांगितले की,आर.ओ.प्लांट मालकांनी खराब पाणी ग्राहकांना विकून जनतेची फसवणूक केली आहे.आर.ओ.प्लांटवर पैसे देऊनही ते गावाला दूषित पाणी पाजत असून ते ग्रामस्थांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने आम्ही गावातील ग्रामस्थांसोबत असून या दूषित पिण्याचे पाणी देणाऱ्या आर.ओ.प्लांटवर जर ग्रामपंचायत प्रशासन,आरोग्य खाते,अन्न व प्रशासन विभाग,आदी सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जर त्वरित कडक कारवाई केली नाही तर आम्ही ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे पेरणेचे माजी सरपंच निलेश उर्फ बाबाजी वाळके यांनी माहिती देताना सांगितले. तसेच

अशुद्ध पाणी असलेले आर.ओ.प्लांटचे नावे

प्युअर ड्रॉप ,जलश्री वॉटर सप्लायर्स ,देवांश वॉटर सप्लायर्स, प्रेम राज वॉटर,साईशा वॉटर, गावडे वॉटर, सिद्धेश्वर वॉटर युनिट-२, आहेत. असे हि त्यांनी सांगितलं

[दोनदा दूषित पाणी अहवाल आल्याने आर.ओ.प्लांट बंद ठेवा;ग्रामपंचायतीकडून नोटिसा:

पाणी तपासणी अहवाल दूषित व न पिण्यायोग्य आल्याने ८ आर.ओ.प्लांट धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून पाणी शुद्ध करण्याच्या उपायोजना सांगण्यात आले आहेत.११ जुलैला दूषित पाणी असल्याचा अहवाल आला,त्यानंतर पुन्हा २४ जुलै रोजी दुसऱ्यांदा दूषित पाणी असल्याचा अहवाल आल्याने २८ जुलैला हे सर्व आर.ओ.प्लांट बंद ठेवण्यात सांगितले.पुढच्या काळात त्यांच्यावर कायदेशीर योग्य कारवाई करण्यात येईल.

दादाभाऊ नाथ,ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत पेरणे]

[वेगवेगळ्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढ झाल्यामुळे आम्ही पिण्याचे पाणी तपासणीचा निर्णय घेतला.त्यामध्ये ९ आर.ओ.पाणी प्लांट पैकी ८ प्लांट वरील पाणी अशुद्ध असल्याचे निदर्शनास आले.त्यांच्यावर जी काही कारवाई करण्याचे ते आम्ही पेरणे ग्रामपंचायतीला कळविले आहे.

डॉ.प्रज्ञा घोरपडे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी-प्राथमिक आरोग्य केंद्र,पेरणे]

क्लोरीन पावडर वापरत नसतील याबाबत पाणी पुरवठा कडून माहिती मागून घेतो,हे खाजगी प्लांट आहे.शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीची चौकशी करू तर या विषयाबाबत मी ग्रामविकास अधिकारी व सरपंच याच्याशी बोलून घेतो.यावर पुढील कार्यवाही करू.

सुरेश गोरे,हवेली तालुका आरोग्य अधिकारी]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!