अपहरण झालेल्या मुलीला पाच तासात सुखरूप केले पालकांच्या स्वाधीन; महाड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
✍️ नितीन करडे
पुणे : अपहरण झालेल्या मुलीला महाड तालूका पोलीसांनी पाच तासात सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
महाड पोलीस ठाणे गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी शाळेच्या सहलीला रायगड किल्ल्यावर पिकनिक करिता आली होती. तिला आरोपी तेजस संजय पाटील (वय २०वर्ष) रा. शेळगाव ता. जामनेर जिल्हा जळगाव, याने शाळेच्या स्कूल बसचा दुचाकीवरून पाठलाग करीत जळगाव वरुन रायगड येथे येऊन (ता. ११ डिसेंबर २०२४) रोजी सायंकाळी ०५: ३० वाजता हिरकणी वाडी येथून आमिष दाखवून फुस लावून पळून नेलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असून अवघ्या पाच तासात सदर गुन्ह्यातील अपहरित मुलगी व संबंधित आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना उरुळी देवाची धनगर वस्ती येथून ताब्यात घेऊन महाड पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीसांनी मुलीला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले आहे. ही कौतुकस्पद कामगिरी महाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पो हवा अभिजीत कदम, मनीष भोईर, अभिषेक पोटे, रणजीत नागे, प्रसाद मोरे, महिला पो शि ऐश्वर्या धोत्रे, यांनी केली आहे. तसेच पुढील गुन्ह्याचा अधिक तपास शंकर काळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड व महाड तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.























