Homeआरोग्यगावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याचा उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा संकल्प!

गावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याचा उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा संकल्प!

गावोगावी आरोग्यसेवा पोहोचविण्याचा उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा संकल्प!
१०० हून अधिक ग्रामस्थांचा सहभाग; सुमारे ७० नागरिकांची आरोग्य तपासणी; ग्रामीण आरोग्य संवर्धनासाठी निसर्गोपचार आश्रमाचा पुढाकार
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निसर्गोपचार आश्रम, उरुळी कांचन यांच्या वतीने बोरी भडक (ता. दौंड) येथे योग व निसर्गोपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बोरी भडक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १०० हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर सुमारे ७० नागरिकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यात आली.

निसर्गोपचार आश्रमाचे संचालक डॉ. अभिषेक देविकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. भगवती यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. तसेच निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. योगशिक्षक जालिंदर वाडेकर यांनी निसर्गोपचाराची संकल्पना, उपचारपद्धती, दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व आणि निसर्गोपचार आश्रमाचा ऐतिहासिक वारसा याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोरी भडकच्या सरपंच कविता कोळपे, उपसरपंच प्रवीण खेडेकर, ग्रा. सदस्य उर्मिला कोळपे, माजी उपसरपंच पूनम गव्हाणे, पवन ढवळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना योग व निसर्गोपचारावर आधारित आरोग्यसेवा सुलभ, परवडणाऱ्या दरात आणि त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देणे हे निसर्गोपचार आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संचालक डॉ. अभिषेक देविकर यांनी सांगितले. निसर्गोपचार आश्रम चे कार्यकारी विश्वस्त  डॉ. नारायण हेगडे यांचीही सामुदायिक आरोग्यसेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याची नेहमीच तळमळ राहिली आहे. त्याच विचारातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमांतर्गत दर महिन्याला ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये योग प्रशिक्षण, निसर्गोपचार, आरोग्यविषयक जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देऊन त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा तसेच गरजेनुसार उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात उपलब्ध असलेल्या योग व निसर्गोपचार सेवांचा परवडणाऱ्या दरात लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संचालक डॉ. अभिषेक देविकर, योगशिक्षक जालिंदर वाडेकर, राहुल मेमाणे, डॉ. भगवती, तुषार जगदाळे आणि आश्रमातील सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात!

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात! केसनंद आणि कोंढव्यात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश; अंमली पदार्थ विरोधी...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ✍️ नितीन करडे सासवड :...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

error: Content is protected !!