Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त!

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त!

कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत तब्बल ४ लाख ४३ हजार रुपये, अवैध दारूही जप्त

✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहरातील अंमली पदार्थांची विक्री तसेच अवैध दारू व्यवसायाविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच वानवडी परिसरात दोन संशयितांकडून ८.८६० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ४ लाख ४३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व प्रादेशिक विभागातील फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व पथकाने विशेष मोहीम राबवली.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये दाखल गुन्ह्यात सुमारे एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी इम्रान तनवीर शेख (वय २९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) हा त्याच्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत कमेला परिसरातील स्लेटर हाऊसच्या भिंतीलगत पिंपळाच्या झाडाखाली एक व्यक्ती देशी दारूच्या टँगो पंच बाटल्यांची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून फैजु कादर शेख (वय ५३, रा. स्लेटर हाऊसजवळ, साळुंखे विहार रोड, कमेला, कोंढवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार ११० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन म्हाडा बिल्डिंग, गोसावी वस्ती, नर्मदाबाई किसन कांबळे शाळेजवळ पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार चव्हाण व जोजारे यांना दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून निळ्या रंगाची बॅग घेऊन जात असून, त्या बॅगेत अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोसावी वस्ती परिसरात मोटारसायकलवरील दोघांना अडवले. त्यावेळी मोटारसायकल चालक अल्ताफ ऊर्फ अयाज अकबर शेख (वय १९, रा. न्यू म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) याला पोलिसांनी पकडले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडील निळ्या रंगाच्या बॅगेत तसेच मोटारसायकलच्या डिक्कीत एकूण ८.८६० किलो गांजा आढळून आला. या गांजाची बाजारातील किंमत ४ लाख ४३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच पोलीस अंमलदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, शरद धांडे, सुमित यादव, विनोद निंभोरे, अमोल जगताप, प्रशांत कळसकर, महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे, आरती दिवेकर, सुकेशिनी आंबले, अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, देवीदास वांढरे व दिनेश बास्टेवाड यांनी केली.

पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

error: Content is protected !!