Homeक्राईमसाप आला! म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले; यवत पोलिसांनी सराईत आरोपीला...

साप आला! म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले; यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद करत ६ ग्रॅम सोने केले परत

साप आला! म्हणत वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावले; यवत पोलिसांनी सराईत आरोपीला जेरबंद करत ६ ग्रॅम सोने केले परत
✍️ नितीन करडे

पुणे : दापोडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत शेतात काम करत असलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेची दिशाभूल करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेल्याच्या घटनेचा यवत पोलिसांनी अल्पावधीत छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे (वय १९, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

साप आला’ अशी बतावणी करून वृद्ध महिलेला घाबरवले’

ही घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता दापोडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९ मधील शेतजमिनीत घडली. फिर्यादी सुनंदा बापू रूपनवर (वय ६५) या शेतातील झाडाजवळ बसलेल्या असताना आरोपी सुमित उर्फ घा-या साळुंखे व त्याचे दोन अनोळखी साथीदार मोटारसायकलवरून तेथे आले.

यातील दोघांनी वृद्ध महिलेच्या जवळ जाऊन ‘मावशी, साप आला!’ असे मोठ्याने सांगितले. अचानक साप आल्याचे सांगून महिलेला घाबरवून पळण्यास भाग पाडण्यात आले. महिला घाबरून पळत असताना आरोपींनी तिचा पाठलाग करून गळ्यातील सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिघेही मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना यवत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाची मदत घेत आरोपींचा माग काढला.

अल्पावधीत तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले अंदाजे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, किंमत सुमारे ६५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल, किंमत सुमारे ३० हजार रुपये, असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यातील उर्वरित दोन अनोळखी आरोपींचा शोध यवत पोलिसांकडून सुरू असून, त्याबाबत पुढील तपास केला जात आहे. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिलेने यवत पोलिसांचे आभार मानले आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि दौंड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहा. पोलीस निरीक्षक आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर तसेच पो हवा रॉकी देवकाते, संदिप देवकर, अमोल काळे, पो कॉन्स्टेबल धिरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, प्रतिक धिवार, प्रतिक जगताप, विकास मोरे, दिनेश लोणकर आणि विनित कु-हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास बाळकृष्ण गाडेकर करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : श्रीकृष्ण...

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त ✍️ नितीन करडे पुणे : सासवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला,...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे | प्रतिनिधी- ✍️ नितीन करडे यवत पोलीस...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले; कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराला पुन्हा ‘बार’   उरुळी कांचन प्रतिनिधी :...

error: Content is protected !!