Homeमहत्त्वाचेआठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची...

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारी भरलेल्या आठवडे बाजारात हरवलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला उरुळी कांचन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत तिची सुखरूपपणे आई-वडिलांशी भेट घडवून आणली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान नेहा महेंद्र चौधरी (वय 2 वर्षे) ही चिमुकली उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात एकटीच रडत फिरत असल्याचे एका बाजार घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या निदर्शनास आले. मुलगी हरवलेली असल्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित महिलेने तत्काळ तिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुलगी अतिशय लहान असल्याने तिला स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. हरवलेल्या मुलीची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तसेच आठवडे बाजार परिसरात मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अवघ्या अर्ध्या तासात यश आले आणि मुलीच्या आई-वडिलांचा शोध लागला. त्यानंतर चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीची सुरक्षित सुटका झाल्याने आई-वडिलांनी उरुळी कांचन पोलिसांचे मनापासून आभार मानले.

ही उल्लेखनीय कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव, दत्तात्रय गाडेकर आणि पोलीस शिपाई सारिका गवारे यांनी पार पाडली. त्यांच्या तत्परतेमुळे चिमुकलीची सुरक्षितपणे कुटुंबाशी पुनर्भेट झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

error: Content is protected !!