Homeक्राईमबॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद
✍️ नितीन करडे 

पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात आले. आरोपीकडून सुमारे २७ हजार ४५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक २३ मे २०२६ रोजी रात्री ११ ते २४ मे २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी युनिट ७, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, खंडणी विरोधी पथक २ चे अधिकारी व कर्मचारी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंददरम्यान, पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अभिषेक खंडु भडंगे (वय २५, रा. हिंगणे मळा, हडपसर) हा एका पत्र्याच्या खोलीतून विनापरवाना “MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA” या प्रतिबंधित इंजेक्शनची विक्री करत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याच्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या “TERMIVA” या इंजेक्शनच्या एकूण ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत २७ हजार ४५३ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५, २७८ व १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन येथे ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व किरण पडयाळ यांनी ही कारवाई पार पाडली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत   उरुळी कांचन (ता. हवेली) :...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

error: Content is protected !!